Ad will apear here
Next
‘महिला खेळाडूंची कामगिरी प्रेरणादायी’
अमृता फडणवीस यांचे मत; ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’क्रिकेट संग्रहालयाला भेट
‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ क्रिकेट संग्रहालयातील महिला विभागाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी रोहन पाटे, अम्रिता पाटे व उषा काकडे उपस्थित होत्या.

पुणे : ‘आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. अशा महिला खेळाडूंची कामगिरी इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असते,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुण्यातील सहकारनगर येथील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेट संग्रहालयाला त्यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी खास महिला क्रिकेटपटूंना समर्पित विभागाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’चे संस्थापक रोहन पाटे, उषा काकडे, अम्रिता पाटे उपस्थित होते.


नेहमी कला आणि फॅशन विश्वात रमणाऱ्या अमृता फडणवीस क्रिकेटविश्वातही तेवढ्याच रमल्या होत्या. संग्रहालय बघताना त्यांच्याकडून येणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आठवणींनी त्यांना या क्षेत्राचीही चांगली  माहिती असल्याची जाणीव उपस्थितांना झाली. खास महिला क्रिकेटपटूंसाठी समर्पित असणाऱ्या या विभागात सध्या भारताच्या विविध आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंचे ‘वन डे टी-शर्ट्स’ ठेवण्यात आले आहेत. यात झुलन गोस्वामी, राजश्री गायकवाड, जेमिमा रॉड्रीग्ज, पूनम यादव, दीप्ती शर्मा, एकता बिष्टा आदींचा समावेश आहे.


‘एखाद्याचा छंद जेंव्हा त्याचे ‘पॅशन’ बनते तेंव्हाच असे संग्रहालय निर्माण होऊ शकते,’ अशा शब्दात फडणवीस यांनी पाटे यांचे कौतुक केले. ‘महिला खेळाडूंसाठी स्वतंत्र विभाग उभारल्याने क्रिकेटचे हे संग्रहालय खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाल्यासारखे वाटते. येणाऱ्या पिढ्यांना हे संग्रहालय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यासाठी याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे,’ असेही त्या म्हणाल्या.  

विधानसभेच्या सुरू होऊ घातलेल्या रणधुमाळीचा वेध घेत त्या म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात मी नेहमीच प्रचारासाठी जाते तशी या वेळीही जाईन.’ 

‘केंद्र सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे मी वैयक्तिकरित्या स्वागत करते. गेली कित्येक दशकं प्रलंबित असणारा काश्मीर प्रश्न यामुळे मार्गी लागण्याची आशा वाटते,’ असेही त्या म्हणाल्या.  

(अमृता फडणवीस यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZWNCD
Similar Posts
पुण्यातील क्रिकेटचे संग्रहालय गुगलच्या व्यासपीठावर; घरबसल्या पाहता येणार सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये भारताचे क्रिकेटपटू कशी चमक दाखवणार आणि प्रतिस्पर्ध्यांना नमवून चषक आपल्याकडे खेचून आणणार का, याची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच क्रिकेटवेड्या भारतीयांना अभिमान वाटेल अशी एक गोष्ट घडली आहे. जगभरातील क्रिकेटचा समृद्ध वारसा जतन करणाऱ्या ‘ब्लेड्स ऑफ
‘मी सामान्य जगणे आवडणारी ‘वर्किंग वूमन’ पुणे : ‘‘पती शाहरुख खान आणि मुले यांना असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होतो,’ असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो; परंतु मी कोणत्याही प्रकारची नकारात्मकता दूर ठेवून केवळ सकारात्मक गोष्टीच घेते. मी एक ‘वर्किंग वूमन’ असून, इतरांसारखेच सामान्य जीवन जगायला मला आवडते. इंटिरिअर डिझायनर
‘पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे’ पुणे : ‘भारताची तिन्ही सैन्यदले सक्षम असून, त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते योग्य तो निर्णय घेतील. समाजाने नाही ते प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणू नये;तसेच पाकिस्तानला एकदा धडा शिकवलाच पाहिजे;पाकिस्तानवर भारताने दबाव कायम ठेवला पाहिजे,’ असे उद्गार सैन्यदलासाठी काम करणाऱ्या महिलांनी काढले.
‘देवेंद्र फडणवीस हे ‘डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील’ पुणे : ‘राज्यातील आयआयटी, आयआयएममधील युवकांना एकत्रित करून कार्यान्वित केलेली ‘वॉर-रूम’, शासकीय अधिकाऱ्यांपासून सामान्य तक्रारदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेले ‘आपले सरकार’सारखे व्यासपीठ, व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन याद्वारे सीएसआरच्या निधीतून सुरू झालेली ग्रामीण भागातील विकासकामे, जलयुक्त

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language